सोमवार, ७ मे, २०१२

तुझ्याविना ...

डोळ्यापुढे माझ्या
काळोख दाटते
अंधुक वाटते 
तुझ्याविना ...

जीवनाशी आता 
करून बहाणी 
जगतोय राणी 
तुझ्याविना ...

पैसा न संपत्ती
मिळते अमाप 
मना कैसा लाभ 
तुझ्याविना ...

गोड लागणारी 
लागता अळणी 
मराठी ती गाणी 
तुझ्याविना ...

निशेच्या मोहात 
विझलेले गात्र 
कसली ती रात्र 
तुझ्याविना ...

सारेच तुझ्याशी
हरलेलो आहे
जिंकू मग काय 
तुझ्याविना ...

- रुपेश तेलंग 
7 -5 -2012

लाल लाल

लाल लाल  डौलदार माद्दक मनमोहक केश केसांमघे माळलेले फुल लाल लाल  मंद मंद हवेतुन उडणारी लट  लटेमागे गोबरेसे गाल लाल लाल  नाकामध्ये नथ उगाचच मु...