पाहून खिळता, चोरट्या नजरा
जेव्हा चंद्र माझा, माळतो गजरा
पसरून गंध, मोगरा फुलांचा
कसा श्वासाशी, खेळतो गजरा
न राहिला कुणी, सचेतनी, ध्यानी
कैफिने कैकांना, भाळतो गजरा
विसावतो स्वतः तिच्या केसांसवे
दुरून जीवाला जाळतो गजरा
- रुपेश तेलंग
०४-०५-२०१३
आयुष्य जगताना चांगल वाईट बघताना आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करताना तयार झालेल्या माझ्या कवितांचा संग्रह
मंगळवार, २१ मे, २०१३
गुरुवार, ९ मे, २०१३
मोरपंखी
रुपेरी तराणे हवा मोरपंखी
तु लेउनी यावे छटा मोरपंखी
कपाळी अशा या रेखीव कमानी
नयनी नशिली कडा मोरपंखी
अलगद काया लहरी मौजेत
वाटे धरावे त्या करा मोरपंखी
गुंग मज करी स्वरांची स्वराली
कसा हा मिळावा गळा मोरपंखी
वळून बघावे बघून हसावे
घायाळ करते अदा मोरपंखी
- रुपेश तेलंग
०९-०५-२०१३
तु लेउनी यावे छटा मोरपंखी
कपाळी अशा या रेखीव कमानी
नयनी नशिली कडा मोरपंखी
अलगद काया लहरी मौजेत
वाटे धरावे त्या करा मोरपंखी
गुंग मज करी स्वरांची स्वराली
कसा हा मिळावा गळा मोरपंखी
वळून बघावे बघून हसावे
घायाळ करते अदा मोरपंखी
- रुपेश तेलंग
०९-०५-२०१३
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
मी अन् तु
मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा. तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...
-
होळी निमित्ताने कवितेत दंग मनातील व्यंग शोधूया का मग्न मीच आज कोण्या विचारात आवेश ओघात कसल्याशा माझेच मलाही कळेनासे झाले कोठे ह...
-
मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा. तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...
-
नभातला स्वैरवादी उडणारा पतंग तु फुलांतुनी फुलणारे ना ना विध रंग तु प्रभुचरणी अर्पिलेला अविट अभंग तु महोदधी विहरणारा दर्या सारंग तु सुरक्षा व...