शनिवार, १२ जुलै, २०२५

फक्त व्हावी

 तुझ्या स्पर्शाला गुंतलेलं मन असं भारक्त व्हावी।

तुझ्या कुशीशी विसावणारी ओळख चिरंतक्त व्हावी॥


खुब मालुम आहे तुझ्या नजरेला साद घालणं।

तरी ती क्षणभर थांबणारी भावना स्पष्ट व्हावी॥


हरवलो मी जरी देते आधार, माझे सारे तम हरते।

जगाच्या मार्गी चालताना तुच माझी शक्त व्हावी॥


मला वाटते प्रेम मिळावे अगाध तुला या नशिबी।

माझ्याच छायेत हरवलेली प्रित ती व्यक्त व्हावी॥


मनीषा सारं पूर्ण होवो, मिळो तुला जे हवे ते।

प्रार्थना करतो देवचरणी, तू माझी फक्त व्हावी ॥


-  रुपेश तेलंग

१२-जुलै-२०२५

बुधवार, ९ जुलै, २०२५

जन्मदिवस

शुभेच्छा तुला

आभाळ भरून

असो हर क्षण 

आनंदाचा


मनिषा होऊ दे

पुर्ण सकलं 

मिळू दे सगळं

मनसोक्त 


प्रेम न् उल्हास

तो जवळ यावा

विकार तो जावा 

दूरवर 


आनंदी आनंद

दिवस हा नवा

गोजिरा व्हावा

जन्मदिन

 

- रुपेश तेलंग




गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

लाल लाल

लाल लाल 


डौलदार माद्दक मनमोहक केश

केसांमघे माळलेले फुल लाल लाल 


मंद मंद हवेतुन उडणारी लट 

लटेमागे गोबरेसे गाल लाल लाल 


नाकामध्ये नथ उगाचच मुरडत

नथीमध्ये चमकता  खडा लाल लाल 


मऊ ओठांआड लपलेले जणू मोती 

हसुने फुलले मुखकमल लाल लाल 


एव्हरी घालते ती पोशाख नानारंगी 

सणावारी नेसलेला शालू लाल लाल 


सुखाचा हा आपुला संसार सप्तरंगी 

साजरा करूया हा सण लाल लाल 


- रुपेश तेलंग 

१३ फेब्रुवारी २०२५

फक्त व्हावी

 तुझ्या स्पर्शाला गुंतलेलं मन असं भारक्त व्हावी। तुझ्या कुशीशी विसावणारी ओळख चिरंतक्त व्हावी॥ खुब मालुम आहे तुझ्या नजरेला साद घालणं। तरी ती ...