शनिवार, ७ जानेवारी, २०१२

गर्व

तुझ्या चाहुलींचा कधी भास होतो
उगाचच सुगंधी पुन्हा श्वास होतो..

तुझे ओठ ओलावले आठवोनी
पुन्हा चुंबण्या मोह अधरांस होतो

तुझ्या पैजणांचा खुळावे इशारा
कसा बुद्धिचाही तिथे र्‍हास होतो

तुझे गाभुळूनी बहरणे नव्याने
शिशीरात गंधीत मधुमास होतो

उसळती कशा या उरातून लाटा
तुझ्या पौर्णिमेचाच आभास होतो

हृदय वाहिले मी तुझ्या पावलाशी
तुझा ध्यास घेतो, तुझा दास होतो

तुझी साथ मिळता मला जीवनी या
पहा गर्व माझ्या नशीबास होतो

- प्राजक्ता पटवर्धन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

महाश्वेता

गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा  हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद  गालांतले हसू...