शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

तुझ्या फोटो कडे बघून...

मन माझे बावरलेले
लक्ष नाही ठिकाणावर
कोठे नाही दुसरी कडे
फक्त तुझ्या ओठांवर||

नजर गेली हरून
समोर काहीच नसते
गालावरील खळी तुझ्या
सलतच मला दिसते ||

कान झाले बधीर
ऐकू काही येईना
तुझी मंजुळ हाक
डोक्यातून जाईना ||

झोप गेली उडून
फक्त तुलाच पाहतो
तुझ नाव लिहित
नुसता पडून राहतो ||

जीवन झाल एकाकी
गेलीस तू निघून
असाच जगत आहे
तुझ्या फोटो कडे बघून ||

मूळ कवी - अरुण झिंगुर्डे

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!!

माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना

माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना

तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना

दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना

पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना

पावसाच्या सरींच्या प्रेमात पडलेल्या चातका सारखं आनंदात न्हाताना
माझे दुखा:श्रुही तुझ्या आनंदात गातांना

माझी सारी स्वप्नं तुझ्याबरोबर पूर्ण झालेली पहातांना
सारी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी राहतांना

- अज्ञात

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२

पण कुणासाठी...???

ती नाकावरची फुली...
ते गोबरे गोबरे गाल...
ती हनुवटी वरील खळी...
त्या डौलदार बाजू..
ती नाजूक मनगट...
त्यावर ते रत्नजडीत चमचमत घड्याळ...
तो राजेशाही पोशाख...
ते पाणीदार डोळे...
ते नाजूक स्मित...
ते रेशमी केश...
त्यांना सावरणारा तो मेंदी ने भरलेला हात...
ती चंदेरी बिंदी..
ती लहरी सारखी लट...
त्यावर बसलेले ते सोनेरी फुलपाखरू...



... पण कुणासाठी..???


- रुपेश तेलंग 
१३-०२-२०१२

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...