रंग कमानी नभात
वायुसंगे फिरे गात
ओलावली फुल पात
तुझ्या अनोख्या रंगात
वर ढगांचा पसारा
त्यात झोंबणारा वारा
तरी ना पडे पाऊस
तुझ्या डोळ्यांचा दरारा
झाला पाऊस अधीर
पडे थळी सैरभैर
भिजवले सारे विश्व
नाही कुणाचीच गैर
झरझर झरझर
मस्त पावसाची सर
उगा शिऊनीया गेली
तुझ्या ओठांची किनार
- रुपेश तेलंग
२६-०९-२०१४
आयुष्य जगताना चांगल वाईट बघताना आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करताना तयार झालेल्या माझ्या कवितांचा संग्रह
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
फक्त व्हावी
तुझ्या स्पर्शाला गुंतलेलं मन असं भारक्त व्हावी। तुझ्या कुशीशी विसावणारी ओळख चिरंतक्त व्हावी॥ खुब मालुम आहे तुझ्या नजरेला साद घालणं। तरी ती ...
-
मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा. तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...
-
रुपेरी तराणे हवा मोरपंखी तु लेउनी यावे छटा मोरपंखी कपाळी अशा या रेखीव कमानी नयनी नशिली कडा मोरपंखी अलगद काया लहरी मौजेत वाटे धरावे त्...
-
नभात ढगात, सरी वर्षावात सदेही भिजत, तुला पाहतो मी नटून थटून समोर बसून मला पाहताना तुला पाहतो मी सुखात दुखात, कधी आसवात ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा