मम दर्शनी चैतन्य
तना मनात बहर
गात्रा गात्रात लावण्य
नसा नसात लहर ||
कळवला अंतरंगी
कळवला अंतरंगी
मम आचरणी माया
मज नसे दुजाभाव
नित्य विचारात दया ||
मुग्ध नयनांची ओल
मुग्ध नयनांची ओल
प्रेमे घालिते पाखर
गोड लाघवीच बोल
मृदू घालिती फुंकर ||
पार पाडी मी सत्वर
पार पाडी मी सत्वर
सण सोहळे जागर
सरस्वती लक्ष्मी मी तर
मज सार्यांचा आदर ||
तरी नाळेचेच पुत
तरी नाळेचेच पुत
धुंद लूटती बेहोश
तात, मात, बंधू, सगे
सारे लावताती दोष ||
होते जगी नष्ट भ्रष्ट
होते जगी नष्ट भ्रष्ट
सती सावित्री सगूणा
कधी लावण्या जोहार
करी उद्यूग्न या मना ||
दीन दुबली अबला
दीन दुबली अबला
कोणी म्हणती हो नार
जर नसते मी जगी
होते जग हे निःसर ||
जग रहाटी ही उभी
जग रहाटी ही उभी
हा हा समस्त व्यवहार
मम मायेतुन झुले
अवघाची हा संसार ||
सहे स्त्रीच एकटी
सहे स्त्रीच एकटी
सारी पीडा सारा दर्द
कूस जन्म तिची देते
तेव्हा होती पैदा मर्द ||
पाळा दुधाचे महत्व
पाळा दुधाचे महत्व
ध्यानी राहून सतर्क
जाणा सत्वदेचे सत्व
नच उपेक्षु मज व्यर्थ ||
मूळ कवी - प्रकाशचंद्र तेलंग
मूळ कवी - प्रकाशचंद्र तेलंग
दि. 12 - 08 - 2009