मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

मुखचंद्र पाहिला मी

होऊनी तहानलेला आकन्त पाहिला मी
नि:तेज त्या रात्री, मुखचंद्र पाहिला मी

सांडली केसांवरी जणू कुपी ती अत्तरची
कार्तिकात मोगर्‍याचा सुगंध पाहिला मी

स्वर्ण रूपी ती कांती, चंद्र तारे लेऊनी
हरित वर्णात उभा, निशिगंध पाहिला मी

देखता तव रूप हे, अडखडे पदोपदी
माझ्यासम मूर्ख ना कुणी मंद पाहिला मी

ऐकता शब्द बंधास, देह माझा डोलती
बोलण्यात तुझ्या ग, तो  छंद  पाहिला मी

तुझ्यासवे बोलता, जाहलो मंत्र मुग्ध ग,
मैफीलीत त्या मज , मदधुन्द पाहिला मी...

- रुपेश तेलंग
( ०३ - ०२ - २०११)

1 टिप्पणी:

महाश्वेता

गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा  हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद  गालांतले हसू...