मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

केले रिते..

जीवन माझे
केले रिते
संगती, नाते
केले रिते

स्वार्थी या जगात
सुखाच्या शोधात
दु:खाचे प्याले
केले रिते

मित्रांच्या साथीत
चिखल मातीत
मनोभावानांना
केले रिते

रुढीत प्रथात
एकल पथात
नयनाश्रुंना
केले रिते.

- रुपेश तेलंग
५ / ५ / २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...