गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

पक्ष्यांची शाळा.....

नाक्यावरल्या खांबवर भरते पक्ष्यांची शाळा
रोज वर्ग भरतो त्यांचा मावळतिच्या वेळा

अनंत आकाशात उडतो तो विशलकाय थवा
एकसंगतीतून त्यांच्या काही बोध घ्यायला हवा

'एकतेचे बळ' या पक्ष्यांनीच शिकवलेले
आपण मात्र याचे फक्त धडेच गिरवलेले

त्यांनी अंगीकारलेला तो एकात्मतेचा बाणा
जो तो टिपतो फक्त एक एकाच दाणा

आभाळस भिडणारी त्यांची ऊंच ...ती भरारी
रोजच लक्ष भेदण्याची त्यांची तह्र न्यारी

दिवसभर आकाशी तो थवा उडतो
फुटिरवादी रांग तोडून एक ही नाही पळतो.

जरी दिवसा असतो त्यांचा शिवाशीवीचा खेळ
तरी रात्री चुकत नाही त्यांची परतण्याची वेळ

रात्री जेव्हा सगळ जग असत अगदी शांत
घरट्यात अपूल्या तेही झोपतात निवांत

या पक्ष्यांच्या चिवचिवाटानेच रोज होते माझी सकाळ
पक्षी निरीक्षणात रोज मी गुंततो काही काळ

एकसंघ एकत्र उडणारे हे पक्षी
राष्ट्रीय एकत्मतेचे बनतील साक्षी

नभ ही रंगून जाते या पक्ष्यांच्या रंगात
पाहून नाव चैतन्य भरे माझ्या अंगाअंगात

अरे माणसांनो तुम्हीही पक्षी धर्म पाळा
अस बरच काही सांगते मला पक्ष्यांची शाळा.....


- रुपेश तेलंग
दि २७ - ०२ - २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...