मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

ते काळेशार डोळे...!

मनाला भुरळ घालतात
ते काळेशार डोळे...!
हवे हावेसे वाटतात
ते काळेशार डोळे...!

या जगातील देखणी
वस्तू विचारली असता
माझे मन खुणावते
ते काळेशार डोळे...!

तिच्याशी बोलतांना
पर्केपना वाटतो
मला आपलस करतात
ते काळेशार डोळे...!

तसा तर मी आहे
विद्वानातला विद्वान
पण मला वेड करतात
ते काळेशार डोळे...!

नजरेचा एक
तीक्ष्ण कटाक्ष टाकून
मला घायाळ करतात
ते काळेशार डोळे...!

दुःख आले असता
डोळ्यात पाणी आणून
मलाही रडवता
ते काळेशार डोळे...!

कधी नजरेतून
प्रश्न विचारून
प्रतिसाद मागतात
ते काळेशार डोळे...!

दिसायला दिसतात
अगदीच भोळे
आहेत लब्बाल, चालू
ते काळेशार डोळे...!

चेहरा कोमल
मन निर्मल
आहेत चंचल
ते काळेशार डोळे...!

माझ्या मनात प्रेमाची
आवड निर्माण करतात
तो सुंदर चेहरा
ते काळेशार डोळे...!

- रुपेश तेलंग,
दि. २९ - ०६ - २००९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फक्त व्हावी

 तुझ्या स्पर्शाला गुंतलेलं मन असं भारक्त व्हावी। तुझ्या कुशीशी विसावणारी ओळख चिरंतक्त व्हावी॥ खुब मालुम आहे तुझ्या नजरेला साद घालणं। तरी ती ...