मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

अशी माझी फजीती झाली....!

एक दिवस मी गात होतो
रस्त्यावरुनी जात होतो
सभोवारिचे नव्हते भान
ऐकनार्यांचे पिकले कान
एक खड्ड्यात गेला पाय
अणि आता सांगायचे काय
चार चौघात हसवणूक झाली
अशी माझी फजीती झाली ....!

येतांना ती दिसली दुरून
पाहिले मी तव खालून वरून
मला पाहून ती नाजुक हसली
कटाक्षात काळजातच  घुसली
पाहून झालो वेडा पिसा
श्रावनातील बेडूक जसा
पण ती गोम्याची "......." निघाली
अशी माझी फजीती झाली....!

एकदा अशीच आली लहर
गमतींचा मी केला कहर
टिंगल केली सहकार्याची
जराही न ठेवली त्या नार्‍याची
फोडले बिंग त्याने माझ्या बद्दल
माझी मलाच घडली अद्दल
मस्ती माझी पुरती जिराली
अशी माझी फजीती झाली....!

- रुपेश तेलंग,
दि. ११ जुलै २००९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...