प्रिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ५ जुलै, २०१७

मर्हाटी साज

नऊवारी
नेसली आज
मर्हाटी साज
देखणा बाज
तुझ्या दर्शनी ग...

सागरा
दिसतसे खोल
तिखट से बोल
नी डावा कौल
तुझ्या लोचनी ग...

नयनांचा
नशिला प्याला
हीच मधुशाला
म रोध कशाला
आज पिऊ दे ग...

वळून ही
पाहते अशी
सुरी सोनकशी
जिवाला जशी
पार छेदते ग...

अंदाज हा
दावी कुणास
नी लावे आस
खुद्द मदनास
उगा भुलवी ग...

- रुपेश तेलंग
२४-१२-२०१३

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

मन गेले तिच्यापास

काळ हा थांबला, श्वास मंदावला
तिला झाडाआडून, पाहूनिया ।
बोलण्या आधी हा, शब्दही गोठला
मन गेले तिच्यापास, धावूनिया ॥ धृ ॥

फुले पालवी ही फुलपाखरे
तयाचे जणू हे सगे सोयरे
लट केसांची गालावरी रेटली
छेडण्यास हा वारा कसा भिरभिरे
शुभ्रसा मोती हा, या शिंपल्यातला
वाटे घालु गळा त्यास माळूनिया ॥ १ ॥

- रुपेश तेलंग
१६ -०८ - २०१३

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

प्रिय सखी.....

हृदयात वसशील का?
सह्सोबती हसशील का?
जवळ माझ्या बसशील का?
प्रिय सखी.....

चंद्रसारखी मोहक तू
अग्निसारखी दाहक तू
निष्पाप आणि नाहक तू
प्रिय सखी.....

देह, कांती तव तेजोमय
तूची सूर, ताल न् लय
तू नित्या करीसी मज काव्यमय
प्रिय सखी.....

तूच वसलिस माझ्या चित्ती
गगनासम आहे माझी प्रीती
दिग्गोलात असे आपुली किर्ती
प्रिय सखी.....


-रुपेश तेलंग
दि. २९ - ०६ - २००९

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

तुला पाहतो मी

नभात ढगात, सरी वर्षावात
सदेही भिजत, तुला पाहतो मी 

नटून थटून समोर बसून
मला पाहताना तुला पाहतो मी

सुखात दुखात, कधी आसवात
हलू हुंदक्यात, तुला पाहतो मी 

घरी माझी माय, मला लावी जीव
तिच्या वात्सल्यात, तुला पाहतो मी

तुझी याद येता मी बेचैन होई
तरी बंद डोळ्या तुला पाहतो मी

कधी तू उगाचा धरिसी अबोला
मला छलताना तुला पाहतो मी

असे शब्द गोड मला सुचतात
वही लिहिताना तुला पाहतो मी

- रुपेश तेलंग
११-८-२०११


महाश्वेता

गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा  हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद  गालांतले हसू...