मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

तुला पाहतो मी

नभात ढगात, सरी वर्षावात
सदेही भिजत, तुला पाहतो मी 

नटून थटून समोर बसून
मला पाहताना तुला पाहतो मी

सुखात दुखात, कधी आसवात
हलू हुंदक्यात, तुला पाहतो मी 

घरी माझी माय, मला लावी जीव
तिच्या वात्सल्यात, तुला पाहतो मी

तुझी याद येता मी बेचैन होई
तरी बंद डोळ्या तुला पाहतो मी

कधी तू उगाचा धरिसी अबोला
मला छलताना तुला पाहतो मी

असे शब्द गोड मला सुचतात
वही लिहिताना तुला पाहतो मी

- रुपेश तेलंग
११-८-२०११


४ टिप्पण्या:

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...