संग्रहित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संग्रहित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १९ मार्च, २०१४

सूर

एकदा भेट झाली की
ओळखीचा रंग फुलतो
उलगडत जाणारं नातं
सोबतीचा अर्थ बनतो

आयुष्याची उर्वरीत पाने
आपोआप जोडली जातात
फुलणार्या नवीन नात्याला
निरभ्र करून जातात

वाटेला आलेल्या रंगांचा
अनाहत बेरंग होतो
सूर गवसण्याआधीच
आवाज पोरका होतो

- कल्याणी

मंगळवार, १७ जुलै, २०१२

स्त्री

मम दर्शनी चैतन्य  
तना मनात बहर  
गात्रा गात्रात लावण्य  
नसा नसात लहर ||


कळवला अंतरंगी  
मम आचरणी माया  
मज नसे दुजाभाव  
नित्य विचारात दया ||


मुग्ध नयनांची ओल 
प्रेमे घालिते पाखर  
गोड लाघवीच बोल 
मृदू घालिती फुंकर ||


पार पाडी मी सत्वर  
सण सोहळे जागर  
सरस्वती लक्ष्मी मी तर 
मज सार्यांचा आदर ||


तरी नाळेचेच पुत  
धुंद लूटती बेहोश 
तात, मात, बंधू, सगे  
सारे लावताती दोष ||


होते जगी नष्ट भ्रष्ट  
सती सावित्री सगूणा  
कधी लावण्या जोहार  
करी उद्यूग्न या मना ||


दीन दुबली अबला  
कोणी म्हणती हो नार  
जर नसते मी जगी 
होते जग हे निःसर ||


जग रहाटी ही उभी  
हा हा समस्त व्यवहार  
मम मायेतुन झुले  
अवघाची हा संसार ||


सहे स्त्रीच एकटी  
सारी पीडा सारा दर्द  
कूस जन्म तिची देते 
तेव्हा होती पैदा मर्द ||


पाळा दुधाचे महत्व  
ध्यानी राहून सतर्क  
जाणा सत्वदेचे सत्व 
नच उपेक्षु मज व्यर्थ ||


मूळ कवी - प्रकाशचंद्र तेलंग 
दि. 12 - 08 - 2009 

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

तुझ्या फोटो कडे बघून...

मन माझे बावरलेले
लक्ष नाही ठिकाणावर
कोठे नाही दुसरी कडे
फक्त तुझ्या ओठांवर||

नजर गेली हरून
समोर काहीच नसते
गालावरील खळी तुझ्या
सलतच मला दिसते ||

कान झाले बधीर
ऐकू काही येईना
तुझी मंजुळ हाक
डोक्यातून जाईना ||

झोप गेली उडून
फक्त तुलाच पाहतो
तुझ नाव लिहित
नुसता पडून राहतो ||

जीवन झाल एकाकी
गेलीस तू निघून
असाच जगत आहे
तुझ्या फोटो कडे बघून ||

मूळ कवी - अरुण झिंगुर्डे

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!!

माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना

माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना

तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना

दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना

पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना

पावसाच्या सरींच्या प्रेमात पडलेल्या चातका सारखं आनंदात न्हाताना
माझे दुखा:श्रुही तुझ्या आनंदात गातांना

माझी सारी स्वप्नं तुझ्याबरोबर पूर्ण झालेली पहातांना
सारी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी राहतांना

- अज्ञात

शनिवार, ७ जानेवारी, २०१२

गर्व

तुझ्या चाहुलींचा कधी भास होतो
उगाचच सुगंधी पुन्हा श्वास होतो..

तुझे ओठ ओलावले आठवोनी
पुन्हा चुंबण्या मोह अधरांस होतो

तुझ्या पैजणांचा खुळावे इशारा
कसा बुद्धिचाही तिथे र्‍हास होतो

तुझे गाभुळूनी बहरणे नव्याने
शिशीरात गंधीत मधुमास होतो

उसळती कशा या उरातून लाटा
तुझ्या पौर्णिमेचाच आभास होतो

हृदय वाहिले मी तुझ्या पावलाशी
तुझा ध्यास घेतो, तुझा दास होतो

तुझी साथ मिळता मला जीवनी या
पहा गर्व माझ्या नशीबास होतो

- प्राजक्ता पटवर्धन

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

ओठ !...


तू नभातले तारे माळलेस का तेंव्हा ?
मझियाच स्वप्नाना गाळलेस का तेंव्हा ?

आज तुला का माझे एवढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाललेस का तेंव्हा ?

हे तुझे माला आता वाचणे सुरु झाले...
एक पानही माझे चाळलेस का तेंव्हा ?

बोलली मीठी माझी दे प्रकाश थोडासा !
तू माला तशा रात्री जाळलेस का तेंव्हा ?

कालच्या वसंताला ठेवतेस का नावे;
वायदे फुलयाचे पाळलेस का तेंव्हा ?

चुम्बिलास तू माझा शब्दशब्द एकांती;
ओठ नेमके माझे टाळलेस का तेंव्हा?

- कवीवर्य श्री सुरेश भट्ट




महाश्वेता

गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा  हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद  गालांतले हसू...