Date 24-5-2009
आयुष्य जगताना चांगल वाईट बघताना आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करताना तयार झालेल्या माझ्या कवितांचा संग्रह
सोमवार, ९ जानेवारी, २०१२
Losing My Control
Date 24-5-2009
शनिवार, ७ जानेवारी, २०१२
गर्व
उगाचच सुगंधी पुन्हा श्वास होतो..
तुझे ओठ ओलावले आठवोनी
पुन्हा चुंबण्या मोह अधरांस होतो
तुझ्या पैजणांचा खुळावे इशारा
कसा बुद्धिचाही तिथे र्हास होतो
तुझे गाभुळूनी बहरणे नव्याने
शिशीरात गंधीत मधुमास होतो
उसळती कशा या उरातून लाटा
तुझ्या पौर्णिमेचाच आभास होतो
हृदय वाहिले मी तुझ्या पावलाशी
तुझा ध्यास घेतो, तुझा दास होतो
तुझी साथ मिळता मला जीवनी या
पहा गर्व माझ्या नशीबास होतो
- प्राजक्ता पटवर्धन
शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११
ओठ !...
तू नभातले तारे माळलेस का तेंव्हा ?
मझियाच स्वप्नाना गाळलेस का तेंव्हा ?
आज तुला का माझे एवढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाललेस का तेंव्हा ?
हे तुझे माला आता वाचणे सुरु झाले...
एक पानही माझे चाळलेस का तेंव्हा ?
बोलली मीठी माझी दे प्रकाश थोडासा !
तू माला तशा रात्री जाळलेस का तेंव्हा ?
कालच्या वसंताला ठेवतेस का नावे;
वायदे फुलयाचे पाळलेस का तेंव्हा ?
चुम्बिलास तू माझा शब्दशब्द एकांती;
ओठ नेमके माझे टाळलेस का तेंव्हा?
- कवीवर्य श्री सुरेश भट्ट
शनिवार, १९ नोव्हेंबर, २०११
नि गाणी सुचावी
तुझ्या प्रेरणेने
ती या तर्जनिने
आभाळी लिहाया
शाई रक्त व्हावी
जगाच्या नजरेत तूच विलक्त ह्वावी
तशी वेदनेची मिठीही मला हाय! मोहक्त ह्वावी
मनाच्या गवाक्षात सावल्या तुझ्याच चिरक्त ह्वावी
नव्हे गात्र गात्रात, आतूनही तूच स्पष्ट ह्वावी
कथा प्रेमाचीच ओठातली आज अख्खी वक्त ह्वावी
जिची शेवटासे प्रार्थना अशीच... "तू अस्तित्वक्त ह्वावी"
तुझ्या स्पर्शसावे घनावे तनासंग गंधक्त ह्वावी
तुझी चाल दिसता क्षणोक्षणी वेळा विस्मृत ह्वावी
उजेडात तू अन अंधारात तू, तूच प्रत्येक ह्वावी
शपथी दिलेले, दिले मी तुला, तीच लिपिक्त ह्वावी
तुझी आठवण जेव्हा श्वासात येते... जणू एक ह्वावी
तुझ्या स्पर्शाला गुंतलेलं मन असं भारक्त ह्वावी।
तुझ्या कुशीशी विसावणारी ओळख चिरंतक्त ह्वावी॥
खुब मालुम आहे तुझ्या नजरेला साद घालणं।
तरी ती क्षणभर थांबणारी भावना स्पष्ट ह्वावी॥
हरवलो मी जरी देते आधार, माझे सारे तम हरते।
जगाच्या मार्गी चालताना तुच माझी शक्त ह्वावी॥
मनीषा सारं पूर्ण होवो, मिळो तुला जे हवे ते।
प्रार्थना करतो देवचरणी, तू माझी फक्त ह्वावी॥
मला वाटते प्रेम मिळावे अगाध तुला या नशिबी।
माझ्याच छायेत हरवलेली प्रित ती व्यक्त ह्वावी॥
क्रिकेटचा युवराज
गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११
प्रिय सखी.....
सह्सोबती हसशील का?
जवळ माझ्या बसशील का?
प्रिय सखी.....
चंद्रसारखी मोहक तू
अग्निसारखी दाहक तू
निष्पाप आणि नाहक तू
प्रिय सखी.....
देह, कांती तव तेजोमय
तूची सूर, ताल न् लय
तू नित्या करीसी मज काव्यमय
प्रिय सखी.....
तूच वसलिस माझ्या चित्ती
गगनासम आहे माझी प्रीती
दिग्गोलात असे आपुली किर्ती
प्रिय सखी.....
-रुपेश तेलंग
दि. २९ - ०६ - २००९
पक्ष्यांची शाळा.....
रोज वर्ग भरतो त्यांचा मावळतिच्या वेळा
अनंत आकाशात उडतो तो विशलकाय थवा
एकसंगतीतून त्यांच्या काही बोध घ्यायला हवा
'एकतेचे बळ' या पक्ष्यांनीच शिकवलेले
आपण मात्र याचे फक्त धडेच गिरवलेले
त्यांनी अंगीकारलेला तो एकात्मतेचा बाणा
जो तो टिपतो फक्त एक एकाच दाणा
आभाळस भिडणारी त्यांची ऊंच ...ती भरारी
रोजच लक्ष भेदण्याची त्यांची तह्र न्यारी
दिवसभर आकाशी तो थवा उडतो
फुटिरवादी रांग तोडून एक ही नाही पळतो.
जरी दिवसा असतो त्यांचा शिवाशीवीचा खेळ
तरी रात्री चुकत नाही त्यांची परतण्याची वेळ
रात्री जेव्हा सगळ जग असत अगदी शांत
घरट्यात अपूल्या तेही झोपतात निवांत
या पक्ष्यांच्या चिवचिवाटानेच रोज होते माझी सकाळ
पक्षी निरीक्षणात रोज मी गुंततो काही काळ
एकसंघ एकत्र उडणारे हे पक्षी
राष्ट्रीय एकत्मतेचे बनतील साक्षी
नभ ही रंगून जाते या पक्ष्यांच्या रंगात
पाहून नाव चैतन्य भरे माझ्या अंगाअंगात
अरे माणसांनो तुम्हीही पक्षी धर्म पाळा
अस बरच काही सांगते मला पक्ष्यांची शाळा.....
- रुपेश तेलंग
दि २७ - ०२ - २०११
महाश्वेता
गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद गालांतले हसू...
-
नभात ढगात, सरी वर्षावात सदेही भिजत, तुला पाहतो मी नटून थटून समोर बसून मला पाहताना तुला पाहतो मी सुखात दुखात, कधी आसवात ...
-
गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद गालांतले हसू...
-
शुभेच्छा तुला आभाळ भरून असो हर क्षण आनंदाचा मनिषा होऊ दे पुर्ण सकलं मिळू दे सगळं मनसोक्त प्रेम न् उल्हास तो जवळ यावा विकार तो जावा दूरवर...
