शनिवार, ३ मार्च, २०१२

तो एक क्षण............

ज्या क्षणासाठी आलो आम्ही, तुम्ही
ज्या क्षणाचेच झालो आम्ही, तुम्ही
ज्या क्षणासाठी आहे हे जीवन
तो एक क्षण.....

ज्या क्षणी हळवतो मंद वारा
ज्या क्षणी पडतात पावसाच्या धारा
ज्या क्षणी मनाच्या दुभंगतात तारा
तो एक क्षण.....

ज्या क्षणी फुलतो हिरवा चाफा रानात
ज्या क्षणी हवा गाते मंजुळ संगीत कानात
ज्या क्षणी प्रेमांकुर फुटे आपल्या मनात
तो एक क्षण.....

ज्या क्षणी होत जाई काळे काळे हे आकाश
ज्या क्षणी होत जाई दिसेनासा हा प्रकाश
ज्या क्षणी असे जरा चंद्रोदया अवकाश
तो एक क्षण.....

ज्या क्षणी असे अपुल्या डोईवर नक्षत्र
ज्या क्षणी झोपण्यास सारे ठरतील पात्र
ज्या क्षणास सर्वमते म्हणतात कि हो रात्र
तो एक क्षण.....

- रुपेश तेलंग
३-३-२०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...