रंग कमानी नभात
वायुसंगे फिरे गात
ओलावली फुल पात
तुझ्या अनोख्या रंगात
वर ढगांचा पसारा
त्यात झोंबणारा वारा
तरी ना पडे पाऊस
तुझ्या डोळ्यांचा दरारा
झाला पाऊस अधीर
पडे थळी सैरभैर
भिजवले सारे विश्व
नाही कुणाचीच गैर
झरझर झरझर
मस्त पावसाची सर
उगा शिऊनीया गेली
तुझ्या ओठांची किनार
- रुपेश तेलंग
२६-०९-२०१४
आयुष्य जगताना चांगल वाईट बघताना आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करताना तयार झालेल्या माझ्या कवितांचा संग्रह
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
महाश्वेता
गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद गालांतले हसू...
-
रुपेरी तराणे हवा मोरपंखी तु लेउनी यावे छटा मोरपंखी कपाळी अशा या रेखीव कमानी नयनी नशिली कडा मोरपंखी अलगद काया लहरी मौजेत वाटे धरावे त्...
-
शुभेच्छा तुला आभाळ भरून असो हर क्षण आनंदाचा मनिषा होऊ दे पुर्ण सकलं मिळू दे सगळं मनसोक्त प्रेम न् उल्हास तो जवळ यावा विकार तो जावा दूरवर...
-
मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा. तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा